घरकाम करणार्‍या तरुणीला टेरेसवरुन फेंकून देण्याचा प्रयत्न

अर्जुन भगत सिंग असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली
घरकाम करणार्‍या तरुणीला टेरेसवरुन फेंकून देण्याचा प्रयत्न

घरकाम करणार्‍या एका २६ वर्षांच्या तरुणीचा हत्येचा प्रयत्न करुन पळून गेलेल्या आरोपी सुरक्षारक्षकाला अखेर मालाड पोलिसांनी अटक केली. अर्जुन भगत सिंग असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आर्थिक वादातून अर्जुनने या तरुणीला एका बहुमजली इमारतीच्या टेरेसवरुन फेंकून देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात ती सुदैवाने बचावली होती.

गोरेगाव येथे राहणारी ही तरुणी घरकाम करते. ती सध्या मालाड येथील सुंदरनगरातील ब्ल्यू होरायझन इमारतीच्या ए आणि बी विंगमध्ये काही फ्लॅटमध्ये काम करीत होती. याच इमारतीमध्ये अर्जुन सिंह हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. गेल्या एक वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर आली होती. यावेळी तिला अर्जुनने बोलाविले. ए विंगच्या फ्लॅट क्रमांक २००१मध्ये नवीन रहिवाशी राहण्यासाठी आले असून त्यांना घरकामासाठी मोलकरीणीची गरज आहे असे सांगून त्याने तिला २०व्या मजल्यावर नेले. मॅडमकडे आजचा दिवस काम केल्यावर तिला या कामाचे तीन हजार रुपये मिळतील असे सांगितले होते. २०व्या मजल्यावर गेल्यानंतर त्याने तिला टेरेसवर कपडे काढण्यास पाठविले आणि नंतर तिला बेदम मारहाण करुन टेरेसवरुन फेकून देण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in