भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न

भोकातून लॉन्ड्री मध्ये येऊन लॉन्ड्री आणि मुथूट फायनान्सच्या सामायिक भिंतीला भगदाड पाडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले
भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न
Published on

उल्हासनगर : सेंचुरी रेयॉन कंपनीसमोर असलेल्या मुथूट फायनान्स कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या पावर लॉन्ड्रीच्या भिंतीला भगदाड पाडून बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात उल्हासनगर पोलीसानी तपास सुरू केला आहे. उल्हासनगर कॅम्प एक मधील शहाड परिसरात सेंचुरी कंपनीच्या समोर मुथूट फायनान्सची शाखा आहे. येथील सोन्यावर डल्ला मारण्याचा प्लॅन दरोडेखोरांनी आखला होता; मात्र ते मुथूट फायनान्सची भिंत तोडू न शकल्याने पुरता फसला. मुथुट फायनान्स असलेल्या नवनाथ अपार्टमेंट मध्ये शांती कनोजिया यांची लॉन्ड्री आहे. ही लॉन्ड्री रोज प्रमाणे रात्री दहा वाजता बंद करून शांती कनोजिया या घरी गेल्या होत्या. सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे लॉन्ड्री खोलली. त्यावेळी उजव्या बाजूला असलेल्या भिंतीला लागून असलेल्या जिन्यातून कोणीतरी एक माणूस येता करेल एवढे भगदाड पडल्याचे दिसून आले. तसेच त्या भोकातून लॉन्ड्री मध्ये येऊन लॉन्ड्री आणि मुथूट फायनान्सच्या सामायिक भिंतीला भगदाड पाडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. दरम्यान, बँकेतील दरोडाचा प्रयत्न जरी फसलेला असला तरी पोलिसांनी विविध तांत्रिक बाबीच्या अनुषंगाने दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in