एमएमआरडीएने हस्तांतरित केलेल्या पूल, स्कायवॉकचे ऑडिट; पालिका ९० लाख रुपये खर्चणार

मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीए महापालिकेला कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात आला.
एमएमआरडीएने हस्तांतरित केलेल्या पूल, स्कायवॉकचे ऑडिट; पालिका ९० लाख रुपये खर्चणार

मुंबई : एमएमआरडीएने मुंबई महापालिकेला पादचारी पूल, उड्डाणपूल, स्कायवॉकचे ऑडिट करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर डागडुजी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, यासाठी ९० लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीए महापालिकेला कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात आला. त्यानुसार या महामार्गावरील पुलांचे तसेच पादचारी पुलांसह कल्व्हर्टच्या बांधकामांची स्थैर्यता तपासून त्यांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. बांधकामाच्या लेखा परीक्षणासाठी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजी इन्स्टिट्यूट अर्थात व्हीजेटीआय यांची नेमणूक करण्यात आली आहे.

डागडुजी केली जाणार

पूर्व द्रूतगती महामार्गावर सुमारे १४ ते १५ पूल व कल्व्हर्ट आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर सुमारे ४० पूल आणि कल्व्हर्ट आहेत. त्यामुळे या दोन्ही महामार्गाची सुधारणा करताना या मार्गावरील पुलांची डागडुजी करण्याच्या दृष्टिकोनातून हे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर या मार्गावरील पुलांची तसेच कव्हर्स्टच्या किरकोळ तसेच मोठ्या स्वरूपातील कामांचे स्वरूप ठरवून त्यानुसार यासर्वांची डागडुजी केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in