नियम मोडाल, तर लायसन्स रद्द! मुंबईतील होर्डिंग्जचे ऑडिट; पालिकेचा इशारा

मुंबईत होर्डिंग्ज लावण्यासाठी मुंबई महापालिकेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच दर दोन वर्षांनी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात येते
नियम मोडाल, तर लायसन्स रद्द! मुंबईतील होर्डिंग्जचे ऑडिट; पालिकेचा इशारा

मुंबईत चार ते पाच मजली इमारतीच्या उंची ऐवढे होडिॅग्ज जंक्शनवर लावण्यात आले आहेत. मात्र होर्डिंग्ज लावताना पालिकेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधिताचे लायसन्स रद्द करण्यात येते, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

पुण्यात सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि आश्रयासाठी होर्डिंग्ज खाली गेलेल्या ५ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत ही ४० बाय ४०, ३० बाय ४०, २० बाय ३० अशी फिक्स स्ट्क्चर करुन १,०५५ होर्डिंग्ज रस्त्यांवर जंक्शनवर लावण्यात आले आहेत. मुंबईत होर्डिंग्ज लावण्यासाठी मुंबई महापालिकेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच दर दोन वर्षांनी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात येते. ऑडिटमध्ये वाहतूक विभागाची परवानगी, विमा संरक्षण, लायसन्स अपडेट केले का, शुल्क भरले की नाही याची माहिती घेण्यात येते. तसेच होडिॅग्ज नियमानुसार लावण्यात आले नसेल तर प्रथम नोटीस बजावण्यात येते. त्यानंतर दुर्लक्ष केल्यास संबधितांचे लायसन्स रद्द करण्यात येते, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

३० दिवसांची मुदत!

मुंबईच्या रस्त्यांवर जंक्शनवर होडिॅग्ज लावण्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी, विमा संरक्षण, शुल्क भरले की नाही याची माहिती घेण्यात येते. यापैकी काही त्रुटी आढळल्यास नोटीस बजावण्यात येते. नोटीस बजावल्यानंतर ३० दिवसांची मुदत देण्यात येते. त्यानंतर दुर्लक्ष केल्यास संबधितांचे लायसन्स रद्द करण्यात येते, अशी माहिती पालिकेचे विशेष उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in