आम्ही वेगळे आहोत; पण कमी मुळीच नाही!

१०० पैकी दोन ते तीन बालके ऑटिझमग्रस्त; आजाराचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचा निष्कर्ष
आम्ही वेगळे आहोत; पण कमी मुळीच नाही!

जगभरात २ एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम दिवस पाळला जातो. त्यामागे ऑटिझमबद्दल जागरूकता वाढवण्याचा उद्देश असतो. ऑटिझमचे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. १९९० मध्ये ५०० पैकी एक व्यक्ती ऑटिझमग्रस्त होती. ते प्रमाण आता १०० मध्ये दोन ते तीन असे झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने लहान बालकांचा अधिक समावेश असतो.

ऑटिझममुळे मुलाच्या सामाजिक आणि संवादाच्या विकासात व्यत्यय येतो. अशा प्रकारे मुलांचा पालक आणि कुटुंबाशी कमी संवाद, डोळ्यांचा कमी संपर्क, कमी भावनिक गुंतवणूक, कमी समज आणि वागणूक, शिवाय नॉन-व्हर्बल संवादात अडथळे व हावभाव, विकासात अधोगती इत्यादी लक्षणे दिसून येतात. त्याव्यतिरिक्त त्यात हळूहळू लक्षात ठेवलेल्या वाक्यांची पुनरावृत्ती आणि हात फडफडण्यासारख्या हालचालींची लक्षणे दिसतात. हळूहळू नातेवाईक, शेजारी आणि समवयस्कासारख्या समाजातील इतर सदस्यांपासून अलिप्तता निर्माण होते. सामाजिक पातळीवर चिंता निर्माण होते. त्याव्यतिरिक्त वाक्य लक्षात ठेवण्यासाठी अधिक कष्ट करावे लागणे, हात हलणे, थरथरणे इत्यादी इतर हालचालींसारखी लक्षणे विकसित होतात. अशा लक्षणांवर अनुभवी विकासात्मक बालरोगतज्ज्ञ आणि व्यावसायिक थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ ठरावीक पद्धतीने उपचार करतात.

ऑटिझम हा गुंतागुंतीचा आजार बऱ्याच मुलांना जन्मजात असतो, तर काहींना दोन-अडीच वर्षांनंतर लक्षात येतो. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढत असून, १९८५मध्ये अडीच हजारांत एक, असे त्याचे प्रमाण होते. पुढे दहा वर्षांनी पाचशे मुलांत एक, तर २००१ मध्ये अडीचशे मुलांत एक, असे हे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

कुटुंबाचीही महत्त्वाची भूमिका

ऑटिझम परिस्थितीत औषधांची फार छोटी भूमिका आहे. ऑटिझममध्ये न्यूट्रास्युटिकल्स (पोषणपूरक) यांची कोणतीही ठरावीक भूमिका नाही. एमडी आणि टीम न्यू होरायझन्स चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी सांगितले की, ऑटिझमबद्दल असलेल्या गैरसमजुतींचा जास्त परिणाम होऊ देऊ नका. मुलाशी अधिक संवाद साधावा. १२ वर्षांपासून आम्ही लहान मुलांना टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉप दाखवण्याविरुद्ध मोहीम राबवत आहोत. मुलांनी अर्थपूर्ण बोलणे गरजेचे आहे. केवळ डॉक्टर, थेरपिस्ट आणि शिक्षकच नव्हे; तर ऑटिझम सुधारण्यासाठी कुटुंबही महत्त्वाची भूमिका बजावतात.

ऑटिझम म्हणजे काय?

ऑटिझम एक अशी स्थिती आहे जी जवळपास तीन टक्के नागरिकांमध्ये दिसून येते. ती एक जिनो-न्यूरो डेव्हलपमेंटल स्थिती आहे. मेंदूवर परिणाम करणारी एक आनुवंशिक स्थिती आहे. त्यात जन्मापासूनच मुलाच्या विकासावर परिणाम होतो.

अशी आहेत लक्षणे

१. ऑटिझममुळे मुलाच्या सामाजिक आणि संवादाच्या विकासात व्यत्यय येतो. अशा प्रकारे मुलांचा पालक आणि कुटुंबाशी कमी संवाद, डोळ्यांचा कमी संपर्क, कमी भावनिक गुंतवणूक, कमी समज व वागणूक, नॉन-व्हर्बल संवादात अडथळे, हावभावात अधोगती इत्यादी लक्षणे दिसून येतात.

२. त्याव्यतिरिक्त, यात हळूहळू लक्षात ठेवलेल्या वाक्यांची पुनरावृत्ती आणि हात फडफडण्यासारख्या हालचालींची लक्षणे दिसतात. नातेवाईक, शेजारी आणि समवयस्कांपासून अलिप्तता निर्माण होते.

३. सामाजिक पातळीवर चिंता निर्माण होते. वाक्य लक्षात ठेवण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतात. हात थरथरणे, हालचाली मंदावणे यांसारख्या बाबींवर विकासात्मक बालरोगतज्ज्ञ, थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ ठरावीक पद्धतीने उपचार करतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in