'अटल सेतू'चे नियम धाब्यावर! 'नो एंट्री' असलेल्या रिक्षाचीही एंट्री? फोटो व्हायरल

'सेल्फी प्रेमीं'नंतर आता या पुलावरून चक्क रिक्षा धावत असल्याचे फोटो व्हायरल...
'अटल सेतू'चे नियम धाब्यावर! 'नो एंट्री' असलेल्या रिक्षाचीही एंट्री? फोटो व्हायरल

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू हा भारतातील सर्वात मोठा समुद्री पूल सामान्यांसाठी शनिवारपासून सुरू झाला. या पुलावर विनाकारण वाहने थांबवण्याची परवानगी नसतानाही रस्त्याच्या कडेला वाहने उभे करून सेल्फी काढणाऱ्यांचे अनेक फोटो-व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याप्रकरणी प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी २६४ वाहनचालकांवर प्रत्येकी ५०० रुपये दंडाची कारवाईही केली. अशात आता या पुलावरून चक्क रिक्षा धावत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. अटल सेतूवरून तीनचाकी वाहने आणि दुचाकींना परवानगी नसतानाही या मार्गावरुन एका रिक्षाचालकाने रिक्षा चालवल्याचा दावा केला जात आहे.

खरंतर भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांमुळे कमी वेग असलेल्या रिक्षा, दुचाकी अशा वाहनांना या मार्गावर बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांमुळे अपघाताची शक्यता बळावते. असे असतानाही अटल सेतूवर रिक्षा धावतानाचा फोटो बघून या पूलासाठी खरंच काही नियम आहेत की सर्व नियम फक्त कागदावरच आहेत, असा सवाल नेटकरी उपस्थित करीत आहेत. नियम धाब्यावर बसवून अटल सेतूचा पिकनिक स्पॉट बनत असल्याची टीका करत अशा लोकांवर कारवाईची मागणी होत आहे.

दरम्यान, शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या १० किलोमीटर ४०० मीटर एवढ्या हद्दीच्या वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलीस पाहत आहेत. उर्वरीत १० किलोमीटर ४०० मीटर भागाची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांकडे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in