अविनाश आंब्रेची लोकलमध्ये गोंधळातून अंबे मातेला साद; रेल्वेतील प्रवासी झाले मंत्रमुग्ध

प्रवाशांकडून अभंग आणि हरिपाठाचे पठण काही प्रवाशांकडून मागील अनेक वर्षांपासून केले जात आहे
अविनाश आंब्रेची लोकलमध्ये गोंधळातून अंबे मातेला साद; रेल्वेतील प्रवासी झाले मंत्रमुग्ध

आपली संस्कृती जपण्यासाठी आजची तरुणपिढी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभाग घेत आहेत. अशातच मुंबईची लाईफलाईन असलेल्या उपनगरीय रेल्वेमार्गावर एका तरुणाच्या मधुर आवाजाने, त्याने गायलेल्या अभंगांनी रेल्वेतील प्रवासी मंत्रमुग्ध होत आहेत. नवरात्रोत्सव सर्वत्र साजरा होत असतानाच डोंबिवली येथे राहणाऱ्या अविनाश आंब्रे या तरुणाने आपल्या अभंगांनी, देवीच्या गोंधळाने प्रवाशांना स्वतःसहीत प्रवाशांना देखील आंबे मातेच्या भक्तीत तल्लीन केले आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी दैनंदिन वाहतूक करतात. प्रवासादरम्यान देवाचे नामस्मरण करण्यासाठी रेल्वे डब्यात सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास प्रवाशांकडून अभंग आणि हरिपाठाचे पठण काही प्रवाशांकडून मागील अनेक वर्षांपासून केले जात आहे; मात्र डोंबिवलीच्या तरुणाने या हरिपाठ आणि भजन संस्कृतीला एक वेगळे वळण देत सोशल मीडियाच्या आधारे घरोघरी पोहचवले आहे. त्याच्या गोड पण तितक्याच भारदस्त आवाजामुळे अवघ्या काही दिवसांत अविनाश सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आपली नोकरी जबाबदारीने पार पाडत प्रवासातील आणि इतर वेळ आपला संप्रदाय आणि आपली संस्कृती वाढवण्यासाठी अविनाश यांच्याकडून समाजाला दिला जात आहे. हे आजच्या युगातील एक महत्त्वाचे आणि आदर्श उदाहरण आहे. नवरात्रोत्सव निमित्ताने त्याने गायलेली 'आई भवानी तुझ्या कृपेने', 'जोगवा मागतो आईचा जोगवा मागतो', अंबाबाई चा उदो उदो या भजन, आरत्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in