पावसाळ्यात झाडाखाली उभे राहणे टाळा, भित्तीचित्रांच्या माध्यमातून पालिकेचे जनजागृती अभियान

मुंबईत पालिकेच्या हद्दीत सुमारे ३० लाख झाडे आहेत. त्यापैकी एक लाख ९२ हजार झाडे रस्त्यावर आहेत.
 पावसाळ्यात झाडाखाली उभे राहणे टाळा, भित्तीचित्रांच्या माध्यमातून पालिकेचे जनजागृती अभियान

मुंबईत सद्य:स्थितीत ७०० झाडे धोकादायक स्थितीत असून, अतिवृष्टी अथवा पावसाळ्यात सोसायट्याच्या वाऱ्यात ही झाडे कोसळण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे जोरदार पाऊस व सोसायट्याचा वारा वाहत असताना झाडाखाली उभे राहू नये, यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. मुंबईत पाच हजार ठिकाणच्या झाडांवर भित्तीचित्रे लावण्यात आली असून, पावसाळ्यात झाडाखाली उभे राहणे टाळा, असे आवाहन या भित्तीचित्रांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

मुंबईत पालिकेच्या हद्दीत सुमारे ३० लाख झाडे आहेत. त्यापैकी एक लाख ९२ हजार झाडे रस्त्यावर आहेत. पावसाळापूर्व व नंतर त्यातील दीड लाख झाडांची, फांद्याची छाटणी करण्यात आली. यामध्ये ५२३ झाडे मृत किंवा धोकादायक स्थितीत आढळून आली. ती हटवण्यात आली आहेत. १ ते ३० जून या कालावधीत पालिकेच्या हद्दीत ३२ व खासगी आवारांमध्ये ८१ झाडे पावसामुळे कोसळली आहेत. तसेच मुंबईत फांद्या पडण्याच्या २०५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावध करण्यासाठी भित्तीचित्रे, स्टिकर लावण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in