उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुनगंटीवार म्हणाले की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यापूर्वी ३० ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

राज्य शासनाने ३१ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेस सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्यास दोन सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुनगंटीवार म्हणाले की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यापूर्वी ३० ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु वाढता प्रतिसाद आणि मुदत वाढीची मागणी विचारात घेऊन सदर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता दोन सप्टेंबर करण्यात येत आहे. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळ २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

इथे करा अर्ज

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. किंवा स्थानिक पोलीस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु ल देशपांडे महाराष्ट्र कलाकादमी मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ईमेल वर दिनांक २ सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in