मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील २५ फ्लडिंग पॉइंट्स पावसाळ्यात पाण्याखाली जातात आणि रेल्वेसेवा ठप्प होते. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांपर्यंत मदत कशी पोहोचावावी, यासाठी मॉकड्रीलच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवा, असे निर्देश आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या बैठकीत सहाय्यक आयुक्तांना दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील सखल भाग पाण्याखाली जातात आणि रस्तेवाहतूक ठप्प होते. तर रेल्वेहद्दीतील २५ स्थानकांतील रुळांवर पाणी जमा झाल्याने लोकलसेवा कोलमडते. लोकलसेवा विस्कळीत झाल्यावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी अशा परिस्थितीत प्रवाशांना वेळीच मदत कशी उपलब्ध होईल, यासाठी मॉकड्रीलच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येईल.