
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) आयुष अभ्यासक्रमाच्या तसेच फिजिओथेरपी आणि नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्स (बीएनवायएस) या निमवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १ सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) वैद्यकीय अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानंतर सीईटी कक्षाने वैद्यकीय, दंत, आयुष व निमवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी २३ ते ३० जुलैदरम्यान नोंदणी प्रक्रिया राबविली. मात्र एमसीसीकडून फक्त वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
त्यानुसार वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली फेरी पार पडल्यानंतर आता एमसीसीकडून आयुष अभ्यासक्रमांतर्गत असलेल्या बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, तर निमवैद्यकीय अभ्यासक्रम असलेल्या बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी व या 'बीपी ॲण्ड ओ' अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.