Baba Ramdev : महिलांवर केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा माफीनामा; म्हणाले...

बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमामध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली होती
Baba Ramdev : महिलांवर केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा माफीनामा; म्हणाले...
Published on

ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. यानंतर राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली होती. महिला आयोगाने २ दिवसाचा अल्टीमेटम देत त्यांनी यासंदर्भात खुलासा करावा अशी नोटीस पाठवली होती. यावर बाबा रामदेव यांच्याकडून माफीनामा सादर केला असून यामध्ये, आपल्या शब्दांनी ठेच लागली असल्यास माफी मागतो अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

बाबा रामदेव यांनी जाहीर केलेल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, "महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लीपमधून माझ्या शब्दांना चुकीचा अर्थ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी एक तासाच्या व्याख्यानामध्ये वस्त्रांसंबंधी जे वक्तव्य केलं, त्याचा अर्थ माझ्याप्रमाणे वस्त्रांप्रमाणे साधी वस्त्रं असा होता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दांनी ज्यांना वाईट वाटलं त्यांची मी निरपेक्ष भावनेने क्षमा मागतो,"

logo
marathi.freepressjournal.in