
नवजात शिशूंच्या देखभालीसाठी गेल्या वर्षभरात तब्बल ६ लाख ६०० बेबी केअर कीट वाटप करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारने १२० कोटी रुपये खर्च केल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयात गरोदरपणी नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी पहिल्या प्रसूतीच्या वेळी मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर त्यांना शासनातर्फे मोफत दोन हजार रुपये पर्यंत "बेबी केअर कीट’ सन २०१९ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४००८७५ बेबी केअर किट वाटपासाठी रूपये ८० कोटी, तर सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६ लाख ६०० बेबी केअर किट वाटप करण्यात आलेले असून त्यासाठी १२० कोटी खर्च करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या व प्रसूत झाल्यानंतर २ महिन्याच्या आत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी बेबी केअर कीटचे वाटप करण्यात येते. यात नवजात बालकांचे कपडे, टॉवेल, ब्लँकेट मच्छरदाणी, अंगाला लावायला तेल, प्लास्टिक चटई, शाम्पू, नेलकटर, खेळणी, हातमोजे, पायमोजे, आईला हात धुण्यासाठी लिक्विड, बॉडी वॉश लिक्विड, झोपण्याची लहान गादी आदी प्रकारचे साहित्य व हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी लहान बॅग देण्यात येते.
महाराष्ट्र बेबी केयर किट योजनेत नवजात शिशुंच्या मातांना शिशु देखभाल किट प्रदान केली जाईल. महिलांची प्रसूती अधिकाधिक प्रमाणात रुग्णालयात करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देश्यातून सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये नवजात मुलाला आईचे दूध व योग्य पोषण मिळेल यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
बेबी केयर किटमध्ये या साहित्याचे वाटपमुलाचे कपडे
एक छोटी गादी
टॉवेल, प्लास्टिक डायपर (लंगोट)
शरीर मालिश तेल
थर्मामीटर
मच्छर दानी
थंडीपासून बचावासाठी कांबळ
शॅम्पू
नेल कटर
हातमोजे
पायमोजे
बॉडी वॉश लिक्विड
हँड सॅनिटायझर
आईसाठी गरम कपडे\
छोटी खेळणी