शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये मगर ; परिसरात भीतीचं वातावरण

बाजूच्या प्राणी संग्रहालयातून ही मगर स्विमिंग पूलमध्ये आली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये मगर ; परिसरात भीतीचं वातावरण

मुंबईच्या शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये मगर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका कर्मचाऱ्याने मगरीला पाहिल्यानंतर तिला पकडून ड्रममध्ये ठेवलं. यावेळी या मगरीने एका कर्मचाऱ्याला चावा घेतल्याचं देखील सांगण्यात येत आहे. बाजूच्या प्राणी संग्रहालयातून ही मगर स्विमिंग पूलमध्ये आली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्राणीसंग्रहालयातून यापूर्वी साप आणि अजगर सुटुन बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती.

सुदैवाने या घटनेमुळे कुठलीही हानी झाली नाही. एका कर्मचाऱ्याला याबाबत कळताच त्याने मगरील पकडून एका ड्रममध्ये ठेवलं. यानंतर वन विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक यांना घटनेची माहिती देण्यात आली. जलतरण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बाजूला असलेल्या प्राणी संग्रहालयातून ही मगर या पूलमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आधीही साप आणि अजगर याच प्रकारे बाहेर पडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. संबंधीत प्राणी संग्रहालयावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

या प्रकणारव बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, या जलतरण तलावाच्या बाजूला एक प्राणी संग्रहालय आहे. जे अनधिकृत आहरे. त्यातून हे प्राणी पाणी बाहेर येतात. आधी देखील अजगर आणि साप बाहेर आलेले. जर हे प्राणी कोणाला चावले तर जबाबदारी कोणाची? मुळात हे प्राणी पाळायला परवानगी दिली कोणी? या प्राणी संग्रहालयात कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे? ही जागा पालिकेने कोर्टात जिंगली आहे. तरी देखील कारवाई होत नाही. जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाकडून अनेक वेळा या संदर्भात तक्रार केली आहे. तिथे असल्या प्राण्यांना देखील दुरावस्थेत ठेवले जाते मग वनविभाग कारवाई का करत नाही? आज मुंबई आयुक्तांना भेटून हा विषय त्यांच्या समोर मांडणार असल्याच संदीप देशपांडे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in