Mumbai : बेकरी व्यावसायिकांना अनुदान मिळणार - रईस शेख; इंधन बदलण्यासाठी पुरेशी पायाभूत सुविधा पुरवणार

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने लाकडावर चालणाऱ्या बेकरी व्यवसायिकांविरोधात कठोर पावले उचलली आहेत.
 रईस शेख
रईस शेख संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने लाकडावर चालणाऱ्या बेकरी व्यवसायिकांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. या पार्शवभूमीवर बेकरी असोसिएशनच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने इंधन बदलण्यासाठी पुरेशी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांचे मॅपिंग शहरभर करेल, असे आश्वासन महानगर गॅसमार्फत देण्यात आले आहे. तसेच संबंधित व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी विविध योजनांअंतर्गत व्यवसायांना पुरेसे अनुदान देखील दिले जाणार आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सोमवारी पालिका, महानगर गॅस यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आणि बेकरी असोसिएशनच्या आयोजित केलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

यावेळी पायाभूत सुविधांच्या कमतरतेबद्दल, महानगर गॅसने सांगितले की ते संपूर्ण शहराचे मॅपिंग करतील जेणेकरून सध्याच्या पायाभूत सुविधा असलेले क्षेत्र आणि पायाभूत सुविधांची कमतरता असलेल्या क्षेत्रांचे चिन्हांकन केले जाणार आहे. इंधन बदलल्यामुळे परवान्याचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता राहणार नाही. परवान्यांचे नूतनीकरण प्राधान्याने केले जाईल.

अन्न प्रक्रिया उपक्रमांच्या पंतप्रधान औपचारिकीकरण योजनेअंतर्गत व्यवसायाला ३० टक्के अनुदान देखील मिळणार आहे. यासाठी एमपीसीबी देखील सहकार्य करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे व्यवसायांवर कोणताही परिणाम होणार नाही याची खात्री करणे गरजेचे असल्याचे शेख यांनी सांगितले. तसेच महानगर गॅसने कनेक्शनसाठी आवश्यक असलेली डिपॉझिट देखील माफ केल आहे. यामुळे बेकरीधारकाना खूप मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती शेख यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in