बक्षी कमिटीच्या अहवालाची जेएनपीटीमध्ये होळी

ट्रस्टी रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
बक्षी कमिटीच्या अहवालाची जेएनपीटीमध्ये होळी
Published on

उरण : जेएनपीटी येथे कामगारविराेधी जाचक अटींचा उल्लेख अहवालात करून कामगारांचे हक्क आणि अधिकार कमी करण्याचे काम बक्षी कमिटीच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे बक्षी कमिटीने सादर केलेल्या अहवालाची होळी करून निषेध व्यक्त केला गेला. वेतन करार समितीचे सदस्य आणि भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील जेएनपीटीचे कामगार ट्रस्टी रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

बक्षी समितीच्या या अहवालात कामगारविरोधी अनेक जाचक अटी असून कामगारांना लागू असलेल्या पूर्वीच्या कामगार सुविधा कमी करण्याचा डाव आहे. अशा या कामगारांच्या हिताविरोधी असणाऱ्या बक्षी कमिटीच्या विरोधात कामगारांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करून आपला विरोध दर्शविला. या कामगारविरोधी बक्षी कमिटीच्या अहवालाला देशपातळीवर प्रखर विरोध करण्याचे नियोजन भारतीय मजदूर महासंघाच्यावतीने बैठकीत करण्यात आले होते. त्यानुसार जेएनपीटी येथे भारतीय मजदूर महासंघाच्या वतीने, सर्व पदाधिकारी आणि कामगार यांनी बक्षी अहवालाच्या विरोधी घोषणाबाजी करत आपले निवेदन जेएनपीटी प्रशासनाला दिले.

logo
marathi.freepressjournal.in