
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई महापौरांच्या बंगल्यातील स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. आठ वर्षांपूर्वी स्मारकाच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेसह अन्य याचिका मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सर्व याचिका फेटाळून लावल्या.
बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याला विरोध नाही. परंतु शिवाजी पार्क येथील मुंबई महापौर बंगल्याची जागा देण्यात येणार आहे. त्या विरोधात असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. महापालिकेने ही जागा वार्षिक एक रुपया दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआरटीपी कायद्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.