बाळासाहेबांचे तैलचित्र अनावरण : राज ठाकरेंसह अन्य सत्ताधारी, विरोधकांची सोहळ्याला हजेरी; उद्धव ठाकरे अनुपस्थित

शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनात त्यांच्या तैलचित्राचे अनावरणाचा सोहळा आयोजित केला
बाळासाहेबांचे तैलचित्र अनावरण : राज ठाकरेंसह अन्य सत्ताधारी, विरोधकांची सोहळ्याला हजेरी; उद्धव ठाकरे अनुपस्थित

आज शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती राज्यभर साजरी करण्यात आली. अशामध्ये आज सगळ्यांचे लक्ष लागले होते बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्याकडे. कारण, या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहतात का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, आज बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्याला ठाकरे गटाच्या नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आहे.

सध्या या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार हेदेखील उपस्थित आहेत. यांच्यासमवेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषदेच्या अध्यक्षा निलम गोऱ्हे यांनीदेखील हजेरी लावली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबरोबरच शिंदे गटातील अनेक आजी-माजी खासदारही विधानभवनातील या कार्यक्रमात हजर राहिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in