बाळासाहेब ठाकरे शब्दाला जागून आश्वासन पूर्ण करत होते - दीपक केसरकर

बाळासाहेब ठाकरे शब्दाला जागून आश्वासन पूर्ण करत होते - दीपक केसरकर

कालपर्यंत न फिरणारे आज शिवसेनेच्या शाखा-शाखांमध्ये फिरत आहेत.
Published on

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करू असे कधी आपण आश्वासन दिले होते का? मला मुख्यमंत्री बनण्यात रस नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत युती तोडा आणि निवडणूक पूर्व युती करा, असे शिंदे यांनी म्हटले होते का? या आम्ही विचारलेल्या तीन प्रश्नावर त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाला जागत होते आणि आश्वासन पूर्ण करत होते असे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणाही साधला.

कालपर्यंत न फिरणारे आज शिवसेनेच्या शाखा-शाखांमध्ये फिरत आहेत. युवासेनेचे एक प्रमुख आहेत, त्यांचे नाव घेणार नाही. पण, हे कालपर्यंत ते कुठे दिसत नव्हते. सातव्या मजल्यावरील आपल्या कार्यालयात किती वेळेस ते गेले. त्यांनी किती गाठी भेटी घेतल्या असा प्रश्न करताना आज तुम्ही मुंबईत दिसत आहात, अशी टीका केसरकर यांनी केली

logo
marathi.freepressjournal.in