बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आकर्षक फुलांनी बहरले; पुणे, सोलापूरहून १५०० शोभिवंत झाडांची लागवड

२३ जानेवारीला बाळासाहेबांची जयंती असून आठ दिवस आधीपासून पालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचारी स्मृतीस्थळी आकर्षक फुलांनी लागवड करतात
बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आकर्षक फुलांनी बहरले; पुणे, सोलापूरहून १५०० शोभिवंत झाडांची लागवड

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर शिवाजी पार्क मैदानातील स्मृतीस्थळी महाराष्ट्रासह देशभरातील तमाम शिवसैनिक, त्यांचे चाहते नतमस्तक होतात. मंगळवारी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त स्मृतीस्थळ आकर्षक फुलांनी बहरले आहे. पुणे, सोलापूर, मुरबाड आदी ठिकाणांहून १२०० ते १५०० विविध प्रजातींची फुलांची रोपटी आणली असून, या ठिकाणी लावण्यात आली आहेत.

२३ जानेवारीला बाळासाहेबांची जयंती असून आठ दिवस आधीपासून पालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचारी स्मृतीस्थळी आकर्षक फुलांनी लागवड करतात, असे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. शिवसेना आणि शिवाजी पार्क हे अतूट नाते असून बाळासाहेबांच्या भाषणांनी मैदान दणाणून सोडले आहे. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी मातोश्री निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमधील जागेत त्यांचे स्मृतीस्थळ बनवण्यात आले आहे. या स्मृतीस्थळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीय व शिवसेनेचे जेष्ठ नेते व देशभरातील तमाम शिवसैनिक २३ जानेवारीला नतमस्तक होत असतात. त्यामुळे शोभीवंत झाडांची लागवड, रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आल्याचे परदेशी म्हणाले.

‘या’ फुलांचा समावेश :

स्मृतीस्थळावरील जागेचे सुशोभिकरण करण्यासाठी पुणे, सोलापूर मुरबाड आदी ठिकाणांहून सुशोभित झाडांची रोपे आणली आहेत. यामध्ये रेड पॉईंटसेटिया, यलो पॉईंटसेटिया, झेंडू आदी फुलझाडांचा समावेश आहे. यासाठी ३०० फुलझाडांची रोपटी ही रेड पॉईंटसेटिया आणि २५० यलो पॉईंटसेटियाची आहेत. तसेच सफेद शेवंती, प्लांबेंगो आदींची रोपटी तसेच ग्रीन लॉन लावून स्मृतीस्थळ सुशोभित केल्याचे जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in