Ulhasnagar: उल्हासनगरामधील बाळासाहेबांची शिवसेनाची कार्यकारिणी जाहीर

राजेंद्रसिंह भुल्लर, रमेश चव्हाण यांची उल्हासनगर (Ulhasnagar) शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Ulhasnagar: उल्हासनगरामधील बाळासाहेबांची शिवसेनाची कार्यकारिणी जाहीर

गुरुवारी बाळासाहेबांची शिवसेनाची उल्हासनगरातील कार्यकारिणी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केली. यामध्ये राजेंद्रसिंह भुल्लर महाराज आणि रमेश चव्हाण या दोन शहर प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेनाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांची उल्हासनगर कॅम्प १,२,३च्या शहरप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली. तर, रमेश चव्हाण यांची कॅम्प नंबर ४,५च्या शहरप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केले आहे.

या सोबतच नाना बागूल यांची शहर संघटक, अरुण आशान, अंकुश म्हस्के,गजानन बामणकर,कृष्णा पुजारी यांची उपशहर संघटक, कलवंतसिंग सोहता, जयकुमार केणी, विजय पाटील, नंदू भोईर यांची उपशहरप्रमुख आणि मनिषा भानुशाली यांची महिला शहर संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सुरजितसिंग पंजाबी यांची उल्हासनगर पश्चिमेच्या युवासेना अधिकारी पदावर निवड करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in