बळीराजाचा 'नवरदेव बीएससी ॲग्री' करतोय प्रेक्षकांच्या मनावर राज्य!

शेतकरी असलेले आणि शेतीचा काहीही संबंध नसलेले असे दोन्ही प्रकारचे प्रेक्षक हा चित्रपट आनंदाने बघायला जात आहेत, आणि चित्रपट पसंतीस पडल्याने भरभरून प्रतिसादही देत आहेत.
बळीराजाचा 'नवरदेव बीएससी ॲग्री' करतोय प्रेक्षकांच्या मनावर राज्य!

मुंबई : शेतीवर प्रेम करणाऱ्या आणि अन्नदात्याचा मनापासून सन्मान करणाऱ्या प्रत्येकासाठी असा ‘नवरदेव बीएससी ॲग्री'. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, आणि काही कालावधीतच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी असलेले आणि शेतीचा काहीही संबंध नसलेले असे दोन्ही प्रकारचे प्रेक्षक हा चित्रपट आनंदाने बघायला जात आहेत, आणि चित्रपट पसंतीस पडल्याने भरभरून प्रतिसादही देत आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील चित्रपटगृहात प्रेक्षक गर्दी करत आहेत.

शेती करत असलेल्या ‘बीएससी ॲग्री' मुलाला लग्न जमविण्यासाठी काय उठाठेव करावी लागते, याची साधी, सरळ, सोपी गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. लेखक-दिग्दर्शक राम खाटमोडे आणि सहलेखक विनोद वणवे यांनी शेतकऱ्याच्या भावना अगदी योग्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडल्या आहेत. अभिनेता क्षितीश दाते आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या ग्रामीण भूमिकांचं कौतुक होतंय, तर मकरंद अनासपुरे यांनी साकारलेला वडिलांच्या भूमिकेतील सच्चा शेतकरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. क्षितीश, प्रियदर्शिनी यांच्यासोबतच प्रविण तरडेंचा तडका, मकरंद अनासपुरेंचा हशा, गार्गी फुलेंची प्रेमळ आई, रमेश परदेशींसारखा रांगडा भाऊ, हार्दिक जोशींसारखा तगडा पोलिस, नेहा शितोळेंनी साकारलेली मायाळू वहिनी, संदीप पाठकांची खास भूमिका, तानाजी गळगुंडे आणि विनोद वणवेंनी साकारलेले हवेहवेसे मित्र या सर्वच भूमिका चित्रपटात भाव खाऊन जातात. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी लिहिलेल्या संवादांचंही विशेष कौतुक होतंय. या चित्रपटातील गाणी, सिनेमेटोग्राफी, पार्श्वसंगीत, कलाकारांची उत्तम कामं आणि तरल दिग्दर्शन या सगळ्याच पातळ्यांवर हा चित्रपट सुंदर पद्धतीत साकारला गेला आहे. आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित ‘नवरदेव बीएससी ॲग्री' सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in