गेट वे ऑफ इंडिया येथे फेरीवाल्यांना बंदी

कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर दोन वर्षांनंतर यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला
गेट वे ऑफ इंडिया येथे फेरीवाल्यांना बंदी

गेट वे ऑफ इंडिया येथे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्तींची विरघळलेली माती काढण्यात अडचण येऊ नये, यासाठी पालिकेच्या ‘ए’ वॉर्डाने फेरीवाल्यांच्या समितीलाही आवाहन केले असून, पुढील सात दिवस या ठिकाणी व्यवसाय करण्यास येऊ नये, असे आवाहन पालिकेच्या ‘ए’ वॉर्डाने केले आहे.

कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर दोन वर्षांनंतर यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. गेट वे ऑफ इंडिया येथे लहान-मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टने अटी-शर्तीवर पालिकेला गणेशमूर्ती विसर्जन करण्यास परवानगी दिली होती. बीपीटीच्या अटी-शर्तीनुसार गेट वे ऑफ इंडिया येथे विसर्जन करण्यात आलेल्या गणेशमूर्तीची माती, पूजेचे साहित्य काढत गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्र स्वच्छ ठेवणे पालिकेची जबाबदारी असेल, असे स्पष्ट केले होते. गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात ४८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती व २५३ घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी क्रेनचा वापर केला असून, सोमवारपासून समुद्रातील माती काढण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या ‘ए’ वॉर्डाच्या अधिकाऱ्याने दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in