वांद्रे-मडगाव एक्स्प्रेसला हिरवा झेंडा; आठवड्यातून दोन दिवस धावणार, बघा वेळापत्रक

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस सुरू झाली आहे.
वांद्रे-मडगाव एक्स्प्रेसला हिरवा झेंडा; आठवड्यातून दोन दिवस धावणार, बघा वेळापत्रक
Published on

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस सुरू झाली आहे. या ट्रेनच्या बोरिवली ते मडगाव दरम्यानच्या उदघाटन फेरीला केंद्रीय वाणीज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस नियमितपणे ४ सप्टेंबर २०२४ पासून बुधवार आणि शुक्रवारी धावणार आहे.

ट्रेन क्रमांक १०११५ वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेसची नियमित धाव ४ सप्टेंबरपासून सुरू होईल. ती वांद्रे टर्मिनस येथून दर बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ६:५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला रात्री १० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक १०११६ मडगाव-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसची नियमित धाव ३ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होईल. ती मडगावहून दर मंगळवार आणि गुरुवारी सकाळी ७:४० वाजता सुटेल आणि रात्री ११:४० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. दिवस ही गाडी बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. यामध्ये एसी २ टायर, एसी ३ टायर, एसी ३ टायर इकॉनॉमी, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोचचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in