विराट कोहलीमुळे बंगळुरूला मिळाले विजयीपद

विराट कोहलीमुळे बंगळुरूला मिळाले विजयीपद
Published on

विराट कोहलीने सूर गवसल्याचे संकेत देताना ५४ चेंडूंत फटकावलेल्या ७३ धावांच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुरुवारी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सवर आठ गडी आणि आठ चेंडू राखून विजय मिळवला. गुजरातने दिलेले १६९ धावांचे लक्ष्य बंगळुरूने १८.५ षटकांत गाठून आठवा विजय नोंदवला. या विजयासह बंगळुरूने बाद फेरीची दावेदारी अधिक भक्कम केली. फॅफ ड्यूप्लेसिस (४४) आणि ग्लेन मॅक्सवेल (नाबाद ४०) यांनीही उत्तम योगदान दिले.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने शुभमन गिल (१), मॅथ्यू वेड (१६) यांना लवकर गमावले. वृद्धिमान साहाने ३१ धावा केल्या. ३ बाद ६२ धावांवरून हार्दिक पंड्या (४७ चेंडूंत नाबाद ६२) आणि डेव्हिड मिलर (२५ चेंडूंत ३४) यांनी चौथ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी रचली. मिलर बाद झाल्यावर राहुल तेवतियासुद्धा (२) स्वस्तात माघारी परतला. परंतु हार्दिक आणि रशिद खान (६ चेंडूंत नाबाद १९) यांनी गुजरातला २० षटकांत ५ बाद १६८ धावांपर्यंत नेले.

logo
marathi.freepressjournal.in