विमानात धुम्रपान करणाऱ्या बंगळुरूच्या तरुणाला अटक

ओमान सुरक्षा अधिकाऱ्याने चौकशी केली आणि रिझवी याने आपण विमानाच्या टॉयलेटमध्ये विमानोड्डाणआत धुम्रपान केल्याचे मान्य केले.
विमानात धुम्रपान करणाऱ्या बंगळुरूच्या तरुणाला अटक

मुंबई : ओमान एअरलाईन्सच्या विमानाच्या टॉयलेटमध्ये धुम्रपान करत असल्याचे आढळून आल्याने कबीर सैफ रिझवी (२७) या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. त्याने केवळ धुम्रपानच केले नाही तर ऑक्सिजन साधनाचेही नुकसान केले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

गुरुवारी हा प्रकार घडला. मस्कत-मुंबई हे ओमान एअरलाईन्सचे विमान मुंबई विमानतळावर सकाळी पावणे सात वाजता उतरले. त्यावेळी विमानसेवेचे कर्मचारी मोहम्मद बियाणी यांनी कबीर याला ओमान सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाली केले. रिझवी याने विमानाच्या टॉयलेटमध्ये धुम्रपान केले आणि ऑक्सिजन कीटचेही नुकसान केले असल्याचे बियाणी यांनी ओमान सुरक्षा अधिकाऱ्याला सांगितले. यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी रिझवी याला ताब्यात घेतले गेले आहे. त्यानंतर बियाणी यांनी मुंबई-मस्कत या मार्गावरील विमानोड्डाणासाठी काामावर रुजू व्हायचे असल्याने पुन्हा विमानात परतले.

यानंतर ओमान सुरक्षा अधिकाऱ्याने चौकशी केली आणि रिझवी याने आपण विमानाच्या टॉयलेटमध्ये विमानोड्डाणआत धुम्रपान केल्याचे मान्य केले. त्याने हिरव्या रंगाचा लायटर आणि सिगारेटची चार पाकिटे सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाली केली. रिझवी याने आपण बंगळुरू येथील असल्याचेही सांगितले. यासंबंधात सुरक्षा अधिकाऱ्यांनी रिझवी विरोधात भारतीय घटनेच्या कलम ३३६ खाली एफआयआर दाखल केला असून सहार पोलिसांनी त्याला अटक केली, त्यानंतर तो जामीनावर सुटला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in