सेफ कोठडीतून पळून गेलेल्या बांगलादेशी नागरिकाला अटक

रविवारी सकाळी पावणेसात वाजता तो बाथरुममध्ये गेला होता. तेथून तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : काळाचौकी एटीएसच्या सेफ कोठडीत पळून गेलेल्या अन्वर ऊर्फ शहादत हाशिम शेख ऊर्फ शाजू अबुल या २९ वर्षांच्या बांगलादेशी नागरिकाला एटीएसच्या अधिकार्‍यांनी विक्रोळीतून अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी काळाचौकी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. विशाल उत्तम भारस्कर हे काळाचौकी एटीएस युनिटमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. ८ डिसेंबर २०२२ रोजी या पथकाने मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या शाजू अबुल या बांगलादेशी नागरिकाला अटक केली होती. त्याच्याकडे पोलिसांना बोगस भारतीय दस्तावेजसह पासपोर्ट सापडले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भादवीसह पारपत्र नियम, परकीय नागरिक आदेश कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने कोर्टात तो बांगलादेशी नागरिक असल्याचे तसेच त्याने बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळविल्याची कबुली दिली होती. गुन्हा कबुल केल्यानंतर त्याला २९ सप्टेंबर २०२३ रोजी लोकल कोर्टाने दोषी ठरवून दहा महिन्यांची साधी कैद आणि पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा त्याने आधीच पूर्ण केल्यानंतर त्याच्याविरुद्ध प्रत्यार्पण कारवाईचे आदेश काळाचौकी युनिटला देण्यात आली होती. त्यामुळे तो त्यांच्या सेफ कस्टडीमध्ये होता. रविवारी सकाळी पावणेसात वाजता तो बाथरुममध्ये गेला होता. तेथून तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता.

logo
marathi.freepressjournal.in