
मुंबई : भाऊचा धक्का येथे प्रवासी बोटीवर चालकासह खलाशी म्हणून काम करणार्या तीन बांगलादेशी नागरिकांना येलोगेट पोलिसांनी अटक केली. बिलाल अमजद अली, मोहम्मद अब्दुल मोशिद रशीद मोरल आणि सायबाज हुसैन जमील सरदार अशी या तिघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भाऊचा धक्का, प्रवासी जेट्टीजवळ काही बांगलादेशी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक प्रवासी बोटीची तपासणी सुरू केली होती. यावेळी दोन बोटीतून प्रवास करणाऱ्या बिलाल अली, मोहम्मद अब्दुल आणि सायबाज हुसैन या तिघांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची चौकशी केल्यानंतर ते तिघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले.