बॅंक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनची सभा पार पडली

बॅंक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनची सभा पार पडली

बॅंक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन मुंबई आणि गोवा युनिटची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच दादर येथे पार पडली. या सभेला मुंबई, गोवा, रायगड येथील ८०० अधिकारी उपस्थित होते. असोसिएशनचे सरचिटणीस निलेश पवार आणि अध्यक्ष संजय सावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

या भव्य कार्यक्रमाला बँकिंग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. अ. भा. बँक ऑफीसर्स कॉन्फीडरेशनचे सरचिटणीस सौम्या दत्ता, फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया ऑफीसर्स असोसिएशनचे सरचिटणीस सुनील कुमार, अध्यक्ष संजय दास, चेअरमन मधुसूदन, बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक कार्तिकेयन, मोनिका कालिया, स्वरूप दासगुप्ता, बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक (एचआर) अशोक पाठक यांच्यासह असोसिएशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात कामगार संघटनांच्या नेत्यांनी बँकांशी संबंधित ज्वलंत प्रश्नांवर आपली मते व्यक्त केली.

तर ग्राहकांना प्रभावी चांगली सेवा दिली गेल्यास दर्जेदार व्यवसाय मिळू शकतो, असे मत बँकेच्या कार्यकारी संचालक व मुख्य महाव्यवस्थापकांनी (एचआर) मांडले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in