सरकारी बँक ऑफ महाराष्ट्रला चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा दुप्पट होऊन ४५२ कोटी रुपये झाला आहे. व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ आणि मालमत्ता गुणवत्तेत झालेली सुधारणा यामुळे पहिल्या तिमाहीतील निव्वळ नफा दुप्पट वाढण्यास मदत झाली.
बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये वरील तिमाहीत २०८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता. बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ए. एस. राजीव यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि बढती झालेल्या असतानाही बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात तब्बल ११७.२५ टक्के वाढ केली आहे. तर दुसऱ्या तिमाहीत आम्ही आणखी जोरदार वाढ करण्याचा मानस आहे, असे राजीव म्हणाले. बँकेने तिमाहीत निव्वळ व्याजातून उत्पन्न २० टक्के वाढून १८६६ कोटी रुपये झाले तर आर्थिक वर्ष २०२२च्या पहिल्या तिमाहीत १,४०६ कोटी रुपये उत्पन्न मिळवले होते. व्याजातून मिळणाऱ्या नफ्यात ३.२८ टक्के वाढ झाली असून यापूर्वी हा दर ३.०५ टक्के आहे.