ऑगस्ट महिन्यात बँका १३ दिवस बंद राहणार

पुढील महिन्यात दोन शनिवार आणि पाच रविवारी मिळून बँका सात दिवस बंद असणार आहेत
ऑगस्ट महिन्यात बँका १३ दिवस बंद राहणार

जुलै महिना संपून ऑगस्ट महिना सुरु होण्यास आता जेमतेम काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ऑगस्ट२०२२साठी कॅलेंडर जारी केले आहे. या कॅलेंडरनुसार ऑगस्ट महिन्यात देशभरातील बँका साधारणपणे अर्धा महिना बंद असणार आहेत. देशभरातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका रिझर्व्ह बँकेनं ठरवून दिलेल्या अधिकृत सुट्ट्या, विविध सण-उत्सव तसेच शनिवार आणि रविवारच्या सुट्या इत्यादी पकडून एकूण १३ दिवस बंद राहणार आहेत.

देशातील अनेक राज्यांमध्ये ऑगस्टमध्ये विविध सण आहेत. अशा प्रसंगी विविध राज्यांतील बँकांच्या स्थानिक शाखाही बंद राहतील. पुढील महिन्यात दोन शनिवार आणि पाच रविवारी मिळून बँका सात दिवस बंद असणार आहेत. तथापि, आजकाल आपण ऑनलाइन सुविधा वापरल्यास आपण घरून काम करू शकता.

ऑगस्टमधील बँक सुट्ट्यांची यादी:

१ ऑगस्टला रविवार असल्याने सुट्टी असणार आहे. ८ ऑगस्टला रविवारी सुट्टी, १४ ऑगस्ट रोजी दुसऱ्या शनिवारी सुट्टी, १५ ऑगस्टला रविवारी सुट्टी, २२ ऑगस्टला रविवारी सुट्टी, २८ ऑगस्टला चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. २९ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील.

ऑगस्टमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्या

ऑगस्टमध्ये काही राष्ट्रीय तसेच प्रादेशिक सुट्ट्या आहेत. यातील काही सुट्टया देशभरात तर काही सुट्ट्या ठराविक राज्यांपुरत्या मर्यादित आहेत. १ ऑगस्ट : ड्रुकपा त्शे-झी (फक्त सिक्कीम राज्यातील बँका बंद), ८ आणि ९ ऑगस्ट: मोहरम, ११ऑगस्ट : रक्षाबंधन, १३ ऑगस्ट: देशभक्त दिवस, १५ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्ट: रशी नववर्ष (शहेनशाही), १८ ऑगस्ट : जन्माष्टमी, १९ ऑगस्ट: श्रावण वद/कृष्ण जयंती, २० ऑगस्ट : श्रीकृष्ण अष्टमी, ३१ ऑगस्ट: गणेश चतुर्थी / वर्षसिद्धी विनायक व्रत

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in