मशीद बंदर स्थानकादरम्यान बॅनर पडून रेल्वेसेवा विस्कळीत

ओव्हरहेड वायवरून बॅनर काढण्यासाठी तब्ब्ल अर्धा तास एवढा कालावधी लागला.
मशीद बंदर स्थानकादरम्यान बॅनर पडून रेल्वेसेवा विस्कळीत
Published on

उपनगरीय रेल्वेमार्गावर वारंवार विविध कारणांनी रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या घटना घडत आहेत. बुधवार १० ऑगस्ट रोजी मशीद बंदर स्थानकादरम्यान सकाळी ११ वाजताच्या सुमारास ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने मध्य रेल्वे उपनगरीय डाउन मार्गावर धावणाऱ्या धीम्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. दरम्यान, ओव्हरहेड वायवरून बॅनर काढण्यासाठी तब्ब्ल अर्धा तास एवढा कालावधी लागला. त्यानंतर लोकल सेवा सुरळीत झाली. या घटनेमुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होत मार्गावरील लोकल विलंबाने धावत होत्या.

सकाळी १०.५८ च्या सुमारास मशीद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान कल्याण दिशेला धीम्या मार्गांवर ओव्हरहेड वायरवर एक बॅनर पडला. मोठा बॅनर ओव्हरहेड वायरवर पडल्याने तांत्रिक समस्या उद्भवली. बॅनर काढण्यासाठी ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा बंद करण्यात आला. तसेच डाउन मार्गावरून जाणाऱ्या लोकलही थांबविण्यात आल्या. अखेर बॅनर काढून लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी सकाळी ११.२३ वाजले. मात्र त्यानंतरही कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल १० मिनिटे विलंबाने धावत होत्या.

logo
marathi.freepressjournal.in