बर्फीवाला पुलाचे दोन स्पॅन उंचवावे लागणार; व्हीजेटीआयच्या रिपोर्टला आयआयटीचा हिरवा कंदील

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण २६ फेब्रुवारीला झाले. बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहूपर्यंतच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता. मात्र काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची २.८ मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला होता.
बर्फीवाला पुलाचे दोन स्पॅन उंचवावे लागणार; व्हीजेटीआयच्या रिपोर्टला आयआयटीचा हिरवा कंदील
Published on

मुंबई : अंधेरी येथील गोखले पूल आणि बर्फी वाला पूल यात गोखले पुलाच्या उंचीत दोन मीटरने वाढ झाली आहे. त्यामुळे दोन्ही पूल जोडायचे कसा अशी अडचण निर्माण झाली असली तरी बर्फी वाला पूल पाडण्याची गरज नाही, असा रिपोर्ट व्हीजेटीआयने याआधीच दिला आहे. तरीही आय आयटी मुंबईचा सल्ला घेण्यात आला असून व्हीजेटीआयच्या रिपोर्टला आय आयटीने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे पुलाच्या चार स्पॅनपैकी फक्त दोन पूल उंचवावे लागणार आहेत. जॅक आणि विशेष अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून पुलाचे स्लॅब उंचावले जाऊ शकतात, अशा सूचना आयआयटीने केल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण २६ फेब्रुवारीला झाले. बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहूपर्यंतच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता. मात्र काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची २.८ मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला होता. अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या या कामातील चुकांमुळे पालिकेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने या समस्येवर उपाय सुचवण्यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयकडे परीक्षण करून अहवाल मागवण्यात आला होता. अंधेरी पूर्व-पश्चिमेकडील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बर्फीवाला पूल तोडून नव्याने बांधण्याचा पर्याय आहे. मात्र यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च येऊ शकतो. त्यामुळे पालिकेने व्हीजेटीआयकडे सल्ला मागितला होता. यानुसार ‘व्हीजेटीआय’नंतर आता आयआयटीनेही सोमवारी अहवाला सादर केला. यानुसार आता वेगाने काम करून लवकरात लवकर उत्तर बाजूची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in