सायन पुलावर बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक; वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय दूर होणार

११० वर्षे जुना सायन रोड ओव्हरपूल पाडून नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार
सायन पुलावर बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक; वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय दूर होणार
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : ११० वर्षे जुना सायन रोड ओव्हरपूल पाडून नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षांत नवीन पूल बांधणीचे नियोजन असून दोन वर्षांच्या कालावधीत वाहनधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी बेरिकेड्स, दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका तब्बल १३ कोटी ९४ लाख १६ हजार २८६ रुपये खर्च करणार आहे.

सायन स्थानकातील ११० वर्षं जुना ब्रिटिशकालीन रोड ओव्हर पूल धोकादायक झाल्याने हा पूल पाडून नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसेच पाचव्या व सहाव्या लेनचे काम हाती घेण्यात येणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पूल पाडल्यानंतर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बेरिकेड्स, दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून पुढील ३० महिने याचे नियोजन असल्याचे पालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख विवेक कल्याणकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in