सेंट जॉर्ज रुग्णालयातील वसाहतींची बत्ती गुल १.३० कोटींचे वीज बिल थकवले

सेंट जॉर्ज रुग्णालय हे सरकारच्या रुग्णालयांपैकी महत्त्वाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात
सेंट जॉर्ज रुग्णालयातील वसाहतींची बत्ती गुल
१.३० कोटींचे वीज बिल थकवले

मुंबई : राज्य सरकारच्या अखत्यारीतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेंट जॉर्ज रुग्णालयातील वसाहतींचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने तब्बल १.३० कोटींचे वीज बिल थकवल्याने बेस्ट उपक्रमाने वीज कनेक्शन कट केले. यामुळे वसाहतीतील ६० कुटुंब अंधारात असून रहिवाशांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.

सेंट जॉर्ज रुग्णालय हे सरकारच्या रुग्णालयांपैकी महत्त्वाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. कोरोना काळात या रुग्णालयाच्या कामगारांनी स्वत:चा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून हजारो कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी काम केले. मात्र या कामगारांच्या प्रश्नांकडे पाहण्यासाठी सरकारला वेळ नसल्याची टीका करण्यात येत आहे. हा प्रकार वांरवार घडत आहे. सहा महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला होता. मात्र यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून ‘बेस्ट’कडे पाठपुरावा करून वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यात आला होता. मात्र गुरुवारी पुन्हा एकदा बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सानप यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in