धारावी पुनर्विकास विकासावरून रणकंदण

धारावी पुनर्विकासाच्या विरोधात काढला जाणारा मोर्चा धारावीकर नागरिकांचा नाही, तर धारावीच्या विकासाला विरोध करणाऱ्यांचा मोर्चा आहे
धारावी पुनर्विकास विकासावरून रणकंदण
PM

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत मध्यवर्ती भागात असलेली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी गेल्या अनेक वर्षांपासून धारावीचा पुनर्विकास रखडला असून, अखेर अदानी समूहाकडून मात्र या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधाची मशाल पुन्हा एकदा पेटली आहे.

 धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीला देण्यावरून सध्या काही राजकीय पक्षांकडून विरोध होतोय. तर काहींकडून समर्थन केले जात आहे. यात धारावीकर मात्र या दोन्ही बाजूच्या बाजू ऐकल्यानंतर संभ्रमात आहे आणि फक्त धारावीचा विकास व्हावा अशी भावना प्रत्येक धारावीवासियांची आहे.

ठाकरे गटाचा विरोध

उद्धव ठाकरे गटाने आणि काही राजकीय पक्षांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीला देण्यावरून एक लढा उभारला आहे. राज्य सरकार व अदानी समूहाकडून धारावीचा पुनर्विकास होत असताना कोणतीही स्पष्टता अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळेच धारावीच्या संरक्षणासाठी आणि धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि इतर राजकीय पक्षांनी अदानीला हाकला- धारावी वाचवा- मुंबई वाचवा' असा नारा दिला आहे.

 धारावीच्या विकासाला विरोध करणाऱ्यांचा मोर्चा -पुनर्विकास समिती 

धारावी पुनर्विकासाच्या विरोधात काढला जाणारा मोर्चा धारावीकर नागरिकांचा नाही, तर धारावीच्या विकासाला विरोध करणाऱ्यांचा मोर्चा आहे. धारावीकरांना पक्षाशी आणि राजकारणाशी काहीही घेणेदेणे नाही, धारावीचा आणि धारावीच्या नागरिकांचा विकास व्हावा हीच आमची मागणी आहे हेच आमचे ध्येय आहे, असे वक्तव्य धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष रमाकांत गुप्ता यांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. धारावी पुनर्विकास समितीतर्फे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळेस त्यांच्या सोबत धारावी पुनर्विकास समितीचे कोषाध्यक्ष आणि चर्मकार नेते मनोहर रायबागे, सरचिटणीस राजीव चौबे, उद्योगपती भास्कर शेट्टी, व्यावसायिक वकील शेख आणि प्रवीण जैन उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in