बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प; १५४ पात्र पोलीस गाळेधारकांच्या सदनिकांची केली निश्चित

बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक १, २, ५, १२ व १३ पोलीस विभागाच्या अखत्यारित आहेत.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प; १५४ पात्र पोलीस गाळेधारकांच्या सदनिकांची केली निश्चित

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे ना. म. जोशी मार्ग परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र पोलीस कर्मचारी गाळेधारकांना वितरित करावयाच्या १५४ पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती मंगळवार, दि. २० सप्टेंबर रोजी करण्यात आली. या पात्र गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या व मालकी तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचा क्रमांक, इमारतीचा क्रमांक, इमारतीतील सदनिकेचा मजला निश्चित करण्यात आला.  बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक  १, २, ५, १२ व १३ पोलीस विभागाच्या अखत्यारित आहेत. या निवासी गाळे/ सदनिकांमध्ये राहणाऱ्या १८२ पैकी १५४ पात्र गाळेधारकांची यादी बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तांनी ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाकडे दिली आहे. पात्र गाळेधारकांसाठी सदनिकांची निश्चिती करण्यात आली. प्रस्तावित पुनर्वसन इमारतींत सदनिका निश्चित करण्यात आलेल्या भाडेकरू/ रहिवाशांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.inवर प्रसिद्ध केली जाणार आहे. संबंधित गाळेधारकांसमवेत लवकरच करारनामा केला जाणार आहे. यावेळी उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य जॉनी जोसेफ, राज्य सूचना व विज्ञान अधिकारी मोईज हुसैन अली, मुंबई विकास विभागाचे संचालक सतीश आंबावडे, उपमुख्य अधिकारी (बीडीडी प्रकल्प) राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in