गणोत्सवादरम्यान 'या' पुलांवरुन जाताना घ्या काळजी! मुंबई महापालिकेने जारी केली धोकादायक पुलांची यादी

रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि पुढील आठवड्यात रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत याची खातरजमा करण्याचे निर्देश बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
गणोत्सवादरम्यान 'या' पुलांवरुन जाताना घ्या काळजी! मुंबई महापालिकेने जारी केली धोकादायक पुलांची यादी

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरात हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान काही दुर्घटना घडून नये यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी खबरदारी घेतली जाते. मुंबईत गणेशोत्व मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने खबरदारी म्हणून बीएमसीने पावले उचलायचा सुरुवात केली आहे. बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गणेशमुर्ती आगमन आणि विसर्जनाच्या मार्गाचा आढावा घेण्याचे तसंच रस्त्यांवर खड्डे पडलेले आढळल्यास ते भरण्याचे निर्देश दिले आहेत.

यावेळी आयुक्त चहल यांनी नागरिक, भाविक आणि गणेश मंडळांनी रेल्वे ओव्हर ब्रिजवर काळजीपूर्वक मिरवणूक काढण्याचं आणि बीएमसी तसंच मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सुचनांचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

यंदा राज्यात १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे. हा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी बीएमसी रस्त्यांची दुरुस्ती गणेश मंडळ परिसर स्वच्छ ठेवणे, विसर्जनाच्या ठिकाणी पूरेशी सुरक्षा व्यवस्था, गणेश मंडळांना परवानग्या देणे आणि इतर सुविधा अशा विविध उपाययोजना राबवत आहे. त्यानुसार चहल यांनी सर्व वॉर्ड कार्यलये, झोन कार्यालयांना गणेशोत्सवाशी निगडीत सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यात रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि पुढील आठवड्यात रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत याची खातरजमा करणे या कामांचा समावेश आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील धोकादायक पूलांवरुन वापरताना काळजी घेण्याचं आवाहन बीएमसीकडून करण्यात आलं आहे. यात खालील पुलांचा समावेश आहे.

1) घाटकोपर रेल्वे पूल

2) करी रोड स्टेशन

3) चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज

4) भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज

पश्चिम रेल्वे मार्गावरील धोकादायक पूलांवरुन वापरताना काळजी घेण्याचं आवाहन बीएमसीकडून करण्यात आलं आहे. यात खालील पुलांचा समावेश आहे.

1) मरीन लाईन रेल्वे ओव्हर ब्रिज

2) सँडहर्स्ट रोड ब्रिज

3) ग्रँट रोड आणि चर्नी रोड दरम्यान फ्रेंच पूल

4) केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रँट रोड आणि चर्नी रोड दरम्यानचा पूल)

5) फॉकलंड पूल (ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल दरम्यानचा पूल)

6) मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ बैलासिस पूल

7) महालक्ष्मी रेल्वे ओव्हर ब्रिज

8) प्रभादेवी-करोल रेल्वे ओव्हर ब्रिज

9) दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज

logo
marathi.freepressjournal.in