वर्सोवा येथे मुलींच्या गटाकडून मारहाण; थरार मोबाईलममध्ये कैद, कारवाईची मागणी

मारहाण करणा-या मुली एका मुलीला शिवीगाळ करताना तसेच तिचे केस ओढताना दिसतात.
वर्सोवा येथे मुलींच्या गटाकडून मारहाण; थरार मोबाईलममध्ये कैद, कारवाईची मागणी
Published on

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही मुलींच्या गटाने शाळेत जाणाऱ्या अन्य मुलीवर हल्ला केल्याची दृश्ये आहेत. हा व्हिडिओ वर्सोव्यातील यारी रोड परिसरातील घटनेचे चित्रण करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

सामाजिक कार्यकर्त्या दीपिका नारायण भारद्वाजने यांनी एक्स या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये, मुलींच्या एका गटाने एका शाळकरी मुलीला मारहाण करतानाचे चित्रण आहे. मारहाण करणा-या मुली एका मुलीला शिवीगाळ करताना तसेच तिचे केस ओढताना दिसतात.

पीडिता हल्लेखोरांपासून स्वतःची सुटका करून घेत तिच्या मित्राकडे गेली. तथापि, मुलींनी पुन्हा एकदा तिला पकडले आणि मारहाण सुरू ठेवली, असेही दिसते. मारहाणीचे संपूर्ण दृश्य व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. यामध्ये तिच्यासोबत असलेल्या तिच्या शाळेतील मैत्रिणीसह मुलीच्या बचावासाठी कोणीही येत नसल्याचेही दिसते.

व्हिडिओ शेअर करणाऱ्या दीपिका नारायण भारद्वाजने यांनी म्हटले आहे की, मुलींच्या टोळीने मुंबईतील यारी रोड येथील शाळेतील मुलीला मारहाण केली. प्राणघातक हल्ला निदर्शनास आणण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटलादेखील टॅग केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून हल्ल्यात सहभागी मुलींच्या गटावर कारवाईची मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in