दुचाकी चोरीच्या संशयावरून मारहाण; तरुणाचा मृत्यू

आकाश संपत गायकवाड हा बोरिवलीतील गोराई येथे राहत असून एका खासगी कंपनीत चालक म्हणून कामाला आहे.
दुचाकी चोरीच्या संशयावरून मारहाण; तरुणाचा मृत्यू

मुंबई : दुचाकी चोरीच्या संशयावरून सचिन दशरथ जैस्वाल या तरुणाची मारहाण करून हत्या झाल्याची घटना मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. आकाश संपत गायकवाड हा बोरिवलीतील गोराई येथे राहत असून एका खासगी कंपनीत चालक म्हणून कामाला आहे.

मृत सचिन हा त्याचा बालपणीचा मित्र आहे. बुधवारी ते दोघेही कांदिवलीतील चारकोप परिसरात आले होते. त्यानंतर ते दोघेही गांजा घेण्यासाठी मालवणीतील गेट आठजवळ गेले होते. आकाश एका गल्लीत गेला तर सचिन हा एका दुचाकीजवळ उभा होता. काही वेळानंतर आकाश बाहेर आला असता त्याला सचिन बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आला. त्याची काहीच हालचाल नव्हती. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

logo
marathi.freepressjournal.in