धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

महिलेला महिलेनेच सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिल्यानंतर आरोपी महिलेच्या पतीने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना...
मुंबईत महिलेवर बलात्कार
मुंबईत महिलेवर बलात्कारप्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूने वापरली जाते

मुंबई: महिलेला महिलेनेच सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिल्यानंतर आरोपी महिलेच्या पतीने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मालवणी (मुंबई) येथे घडली आहे. घृणास्पद बाब म्हणजे सदर घटनेचा अश्लील व्हिडीओ बनवून पीडितेकडे खंडणीची मागणीही करण्यात आली होती. याबाबत मुंबई पोलिसांनी एका 36 वर्षीय महिलेला अटक केली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार आरोपी महिलेनं 22 वर्षांच्या पीडित महिलेला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचं औषध पाजलं. त्यानंतर आरोपी महिलेच्या पतीनं संबंधित महिलेवर बलात्कार केला. सदर घटनेचा व्हिडीओ आरोपी महिलेनं चित्रित केला आणि त्या माध्यमातून पीडितेकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती.

माहितीनुसार, आरोपी महिला ब्युटिशियन आहे. ती पीडितेला आधीपासून ओळखत होती. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी महिलेनं रविवारी पीडितेला आपल्या घरी बोलवलं होतं. तिथं तिला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं. ती बेशुद्ध पडल्यानंतर आरोपीच्या पतीनं तिच्यावर अत्याचार केले. आरोपी महिलेनं या प्रकाराचा व्हिडिओ चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडीओ दाखवून त्यांनी पीडितेकडे 10 हजार रुपयांची मागणी केली. घडलेल्या प्रकारानं घाबरलेल्या पीडितेनं आपल्या मैत्रिणीला याबाबतची कल्पना दिली. मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार पीडितेनं तातडीनं मालवणी पोलिस स्टेशन गाठलं आणि घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी संबंधित घटनेची दखल घेत तातडीनं कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली. आरोपीचा पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in