कोरोनाची चौथी लाट अटोक्यात तरी खासगी रुग्णालयातील बेड्स अॅक्टिव्ह

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा मे महिन्यात शिरकाव झाला आणि रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत गेली
कोरोनाची चौथी लाट अटोक्यात तरी खासगी रुग्णालयातील बेड्स अॅक्टिव्ह

कोरोनाची चौथी लाट मे महिन्यात धडकल्याने तर योग्य उपचार पद्धतीमुळे वेळीच रोखणे शक्य झाले आहे. चौथ्या लाटेचा अधिक फैलाव ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात होईल, असा इशारा कानपूर आयआयटीने दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील जम्बो कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयातील २,५०० हजार बेड्स ऑक्टोबरपर्यंत अॅक्टिव्ह ठेवण्यात आल्याचे मुंबई महापालिका व खासगी रुग्णालयाचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले.

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा मे महिन्यात शिरकाव झाला आणि रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत गेली. रोज ३०० ते ४००च्या घरात आढळणारे रुग्ण चौथ्या लाटेत तीन हजारांच्या घरात गेले; मात्र योग्य उपचार पद्धती, मुंबईकरांची साथ यामुळे चौथी लाट वेळीच रोखण्यात पालिकेला यश आले आहे; मात्र चौथ्या लाटेचा फैलाव ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात होईल, असा स्पष्ट इशारा कानपूर आयआयटीने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची सात जम्बो कोविड सेंटर व पालिका रुग्णालयात २० हजार बेड्स अॅक्टिव्ह ठेवण्यात आले आहेत, तर १४१ खासगी रुग्णालये आहेत. खासगी रुग्णालयात एकूण एक लाख बेड्स असून, सद्य:स्थितीत २,५०० बेड्स अॅक्टिव्ह ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in