मुंबई : गोरगरीब जनतेला शासनाच्या घरकुल योजनेच्या माध्यमातून निवारा देण्यात येतो. त्यासाठी सरकारकडे निधी आहे; मात्र भूखंड उपलब्ध होत नसल्याने गोरगरीब जनता घरकुल योजनेपासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर बेघर संघर्ष समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
ग्रामीण भागात खेडोपाडी घरकुल योजना म्हाडा मार्फत बांधण्याचे काम सुरू करावे. त्यामुळे भूखंड मिळवणे व निवारा करणे या दोन्ही गोष्टी योग्य होतील व भूखंड नाही, अशी बाब समोर येणार नाही. सरकारी योजना कधी कधी कागदावर असतात. कागदावर नसलेल्या तळागाळापर्यंत पोहचतात; मात्र विविध त्रुटी, सबब सांगून त्या लाभार्थीना मिळेपर्यंत भिक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती सामान्य नागरिकांची होते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे शहादा नगरपालिकेत २० कोटी रुपयांचा घरकुल निधी भूखंड नसल्याने पाडून आहे.
गरिबांची घरकुले बांधण्यासाठी आलेला २० कोटी रुपयांचा निधी शहादा नगरपालिकेत पडून आहे. अशा प्रकारे विविध ठिकाणी राज्यभर परिस्थिती असल्याची माहिती बेघर संघर्ष समिती नंदुरबारचे अध्यक्ष दिलावरशाह यांनी दिली यावेळी दिली. सरकारने किती निधी वितरीत केला आहे व किती पडून आहे. याची माहिती सरकारने दिल्याशिवाय मी हे आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे.