३६४ बसवाहकांची BEST मध्ये सरळसेवा भरती; १ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

बेस्ट उपक्रमाने बसवाहक (कंडक्टर) पदासाठी सरळसेवा भरती जाहीर केली आहे. एकूण ३६४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून १ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
३६४ बसवाहकांची BEST मध्ये सरळसेवा भरती; १ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
३६४ बसवाहकांची BEST मध्ये सरळसेवा भरती; १ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरूप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : बेस्ट उपक्रमाने बसवाहक (कंडक्टर) पदासाठी सरळसेवा भरती जाहीर केली आहे. एकूण ३६४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून १ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी आरक्षण लागू राहणार आहे.

उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून मराठी आणि इंग्रजी या विषयांमध्ये उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेला किंवा नूतनीकरण केलेला बसवाहक परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादेनुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्षे अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in