पर्यावरणस्नेही वाहतुकीसाठी बेस्टचा ‘यूआयटीपी’ने गौरव

बार्सिलोना येथे लोकेश चंद्र यांनी स्वीकारला पुरस्कार
पर्यावरणस्नेही वाहतुकीसाठी बेस्टचा ‘यूआयटीपी’ने गौरव

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने घेतला असून पर्यावरणस्नेही वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे.
बेस्ट उपक्रमाच्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या असून बेस्ट उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील युआयटीपी पुरस्कार देण्यात आला आहे. बार्सिलोना येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून बेस्टचे तत्कालीन महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

युनियन इंटरनॅशनल देस ट्रान्सपोर्ट पब्लिक (युआयटीपी) हा पुरस्कार जागतिक स्तरावर पर्यावरण पूरक आणि सुखरूप सेवा देणाऱ्या वाहतूक उपक्रमांना देण्यात येतो. या पुरस्कारासाठी ब्राझील, फ्रान्स, स्पेन, यु के, सिंगापूर या देशातील नामांकने प्राप्त झाली होती. २१ परीक्षकांनी अखेर या पुरस्कारासाठी मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमाची निवड केली. १० हजार इलेक्ट्रिक बस, सोलर एनर्जी, डिजिटल तिकीट सेवा, ईस्कूटर सेवा, प्रीमियम बसेस अशा विविध उपक्रमांमुळे या पुरस्कारासाठी बेस्ट उपक्रमाची निवड करण्यात आली. याच बरोबर २२.५ लाख प्रवासी संख्येवरून दैनंदिन प्रवासी संख्या ३५ लाख इतकी झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in