

मुंबई : शनिवार, १ नोव्हेंबरपासून बेस्ट उपक्रमाने बेस्ट बसमार्गात बदल केले असून काही बसमार्गांचा विस्तार केला असून काही बसमार्ग बंद केले आहेत. काही बस मार्गांचे रूपांतर वातानुकूलित बसमार्गांत केले आहे.
बसमार्ग ६ मर्यादित आता वातानुकूलित ए ६ होईल व टाटा वीज केंद्र ते कुलाबा आगाराऐवजी बॅकबे आगारपर्यंत धावेल. विक्रोळी आगार ते मुंबई सेंट्रल आगार धावणारी ए ३० आता पंडित पलुस्कर चौकपर्यंत धावेल. बॅकबे आगारहून सुटणारी ए ४५ व मुंबई सेंट्रल आगारातून सुटणारी ए ४९ हे दोन्ही बसमार्ग आता एमएमआरडीए वसाहत माहुलऐवजी माहुल गावापर्यंत धावणार आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते शिवडी बस स्थानकपर्यंत धावणारी ६९ ही बस आता वडाळा आगरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. वैशाली नगर मुलुंड ते मरोळ आगारपर्यंत धावणारी ३०७ ही बस आता ए ३०७ या क्रमांकाने होली स्पीरिट रुग्णालय मार्गे मजास आगारपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. ए ३६२ या बसचा विस्तार कुर्ला बस स्थानक पूर्व ते डॉ. आंबेडकर उद्यान येथून सुभाष नगर, आचार्य विद्यालय, खारदेव नगर मार्गे देवनार आगारपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. घाटकोपर आगार ते आगरकर चौक अंधेरी पूर्व दरम्यान धावणारी ए ५३३ ही बस गोखले पूल मार्गे अंधेरी स्थानक पश्चिम विस्तारित करण्यात आली आहे. ए ५०२ नेरूळ सेक्टर ४८ ते देवनार आगारदरम्यान धावणारी बस शिवाजी नगर आगारपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. देवनार आगार ते बोरिवली स्थानक पूर्व दरम्यान धावणारी ए सी ६० आता ए ४५८ या नव्या क्रमांकाने धावेल. राणी लक्ष्मी बाई चौक ते अँटॉप हिल दरम्यान धावणारी बस आता ए ३३६ या क्रमांकाने धावेल. चारकोप ते मरोळ आगार दरम्यान धावणारी ए ४६१ बस आता ए ४६५ या नव्या क्रमांकाने धावेल. वर्ल्ड ट्रेंड सेंटर ते महात्मा फुले मार्केट दरम्यान धावणारी ए २५ आता ए १०१ या नव्या क्रमांकाने धावेल. सांताक्रूझ आगार ते कुलाबा आगार दरम्यान धावणारी ए १ ही बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावेल.
बस मार्गांचे रूपांतर
२०७ , २११, २१५, ३९९ म. ४१९, ६०४, ६०६ या साध्या बस आता वातानुकूलित म्हणून धावणार आहेत. तर ए ३८२, ए ३९६, ए ४०९, ए ४२३ व ए ६०३ या वातानुकूलित बस आता साध्या बसेस म्हणून धावणार आहेत.
हे बसमार्ग बंद
अहिल्याबाई होळकर चौक ते फ्री प्रेस जर्नल मार्ग (१००), बोरिवली स्थानक पूर्व ते जय महाराष्ट्र नगर (ए २९९), काळाकिल्ला गर ते महाराणा प्रताप चौक मुलुंड बस कर्नाक (सी ३०२), विक्रोळी स्थानक पश्चिम ते हिरानंदानी बस स्थानक (४१८), घाटकोपर आगार ते नेरुळ बस स्थानक (ए ५११), कांजूरमार्ग स्थानक पश्चिम ते हनुमान नगर (६०८) व भांडुप स्थानक पश्चिम ते हनुमान नगर (६१२) या बस बंद करण्यात आल्या आहे.