बेस्ट बसथांबे आता सुसज्ज

बेस्ट उपक्रमाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत
बेस्ट बसथांबे आता सुसज्ज

बस थांब्यावर प्रवासी आल्यावर त्या थांब्यांवर आता वायफाय चार्जिंग पाईंट्, अपंग व्यक्तींना चढ उतार करण्यासाठी सोयीसुविधा, थांबा परिसरात न घसरणाऱ्या लाद्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, ई वाचनालय, बस येण्याची वेळ समजणारा डिजिटल बोर्ड, बसवण्यात येणार आहेत. यासाठी सुरुवातीला १० बस थांब्याची निवड करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. बेस्ट उपक्रमाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

बस थांब्यांचा कायापालट करण्यात येत असून शहर व दोन्ही उपनगरातील बस थांबे पारदर्शक करण्याचे काम प्रगतीपथावर आहे; मात्र आता बस थांब्यावर आलेल्या प्रवाशांना आनंदी वातारणाचा अनुभव घेता यावा, तसेच प्रवाशांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने आता बस थांब्यावर प्रवाशांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०० बस थांब्याचे नूतनीकरण

नव्या रचनेसहित प्रवाशांच्या सेवेसाठी २०० बस थांब्यांचे सौंदर्य पूरक व नव्या रचनेसहित नूतनीकरण करण्यात येणार आहे. नव्या रचनेसहित प्रवाशांच्या सेवेसाठी एक हजार बस थांब्याचे सौंदर्य पूरक व नव्या रचनेसहित नूतनीकरण करण्यात येणार आहे. सीएसआर धोरणाअंतर्गत दत्तक योजना सदर योजनेनुसार ५० डिजिटल बसरांग आश्रय स्थानकांचे सामुदायिक दत्तक धोरणानुसार नूतनीकरण हाती घेतले जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in