मुंबई : न्हावाशेवा अर्थात अटल सेतू २१ जानेवारीपासून प्रवासी सेवेत आला. आता अटल सेतूवरून बेस्ट बसेसही धावणार आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणार असून प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता बसेसची संख्या वाढवण्यात येईल. बेलापूर ते कफ परेड वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान प्रवासी सेवेत धावणार आहे. दरम्यान, अटल सेतूवर प्रवासी सेवेत धावणाऱ्या बसेसचे तिकीट अद्याप निश्चित केलेले नाही.
मुंबई ट्रान्स हार्बर अटल सेतू पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ जानेवारीला झाले. २१.८ किलोमीटर लांब अटल सेतू असून या सेतूवर बेसस धावणार ही पहिली सार्वजनिक परिवहन सेवा देणारी असणार आहे. अटल सेतू २१.८ किमी लांब असून १६.५ किमी मार्ग समुद्रावर आहे. अटल सेतू बनवण्यासाठी तब्बल १७,८४० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. अटल सेतूवर बस नंबर एस -१४५ चलवण्याचा निर्णय घेण्यात आला असून बस मार्ग १४५ कोकण भवन, बेलापूर ते कफ परेड वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान धावणार आहे.