बेस्टची क्षमता वाढणार ७०० डबलडेकर, २१शे वातानुकूलित बसेस बेस्टच्या ताफ्यात लवकरच

इलेक्ट्रीक बसेसची संख्या वाढणार आहे
बेस्टची क्षमता वाढणार ७०० डबलडेकर, २१शे वातानुकूलित बसेस बेस्टच्या ताफ्यात लवकरच

मुंबई : कॉसिस कंपनीने ७०० वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. मे २०२४ पर्यंत ७०० एसी डबलडेकर बसेसचा पुरवठा करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर २१०० वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात तीन हजार बसेसचा ताफा लवकरच दाखल होणार असल्याने बेस्टची क्षमता वाढणार आहे.

सध्या बेस्टच्या ताफ्यात ८ जुन्या डबलडेकर बसेस आहेत. मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणू ओळख असलेल्या जुन्या डबलडेकर बसेस इतिहास जमा होणार आहेत. मुंबईची शान कायम रहावी, यासाठी भाडेतत्त्वावरील वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होत आहेत. स्वीच मोबॅलिटी व कॉसिस या दोन कंपन्या मिळून ९०० एसी डबलडेकर बसेसचा पुरवठा करणार आहेत. यापैकी २०० डबलडेकर बसेस स्विच मोबॅलिटी, तर ७०० बसेस कॉसिस कंपनी पुरवठा करणार आहे; मात्र ७०० बसेसचा पुरवठा करणाऱ्या कॉसिस कंपनीने बसेसचा पुरवठा करण्यास नकार दिला होता. कंपनीने नकार दिल्यानंतर बेस्ट उपक्रमाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. अखेर मार्केटमध्ये कंपनीचे नाव खराब होईल, याची धास्ती घेत कॉसिस कंपनीने ७०० एसी डबलडेकर बसेस मे २०२४ पर्यंत पुरवठा करण्यास होकार दिला आहे. तर स्विच मोबॅलिटी कंपनीकडून २०० एसी डबलडेकर बसेस पैकी २० बसेसचा पुरवठा केला असून, उर्वरित लवकरच करण्यात येणार आहे.

इलेक्ट्रीक बसेसची संख्या वाढणार

१ हजार ४०० अधिक ७०० एकमजली इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी गेल्या वर्षी निविदा काढलेली होती. निविदा उघडल्यानंतर ओलेक्ट्रा कंपनी पात्र ठरली होती; मात्र यावर दुसरा निविदाकार टाटा मोटर्सने आक्षेप घेत उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीत निर्णय देताना उच्च न्यायालयाची पुन्हा निविदा मागवण्याची सूचना बाजूला ठेवत बेस्ट प्रशासनाची १४०० बसेस साठीच्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया योग्य ठरवली. यामुळे इव्हे ट्रान्सला मिळालेला २ हजार १०० एकमजली बसचा करार योग्य ठरवला आहे. त्यामुळे २ हजार १०० इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा बेस्टचा मार्ग मोकळा झाल्याने बेस्टच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील आणि इलेक्ट्रीक बसेसची संख्या वाढणार आहे.

लवकरच ताफ्यात येणाऱ्या बस

-ओलेक्ट्रा व इबे - एकमजली वातानुकूलित बसेस - २ हजार १००

-स्विच मोबिलिटी - दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस - २००

-दुमजली इलेक्क्ट्रिक वातानुकूलित बस - ७००

-मिडी डिझेल बस - १५०

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in