मुंबई : चालताना धक्का लागला म्हणून एका जोडप्याने बेस्टमध्ये वाहक म्हणून काम करणार्या दिनेश देवराव राठोड या २६ वर्षांच्या तरुणाला मारहाण केली. धक्का दिल्याने तो रेल्वे ट्रकवर पडला आणि लोकलच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला असून याप्रकरणी जोडप्याविरुद्ध दादर रेल्वे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अविनाश किशोर माने आणि शितल अविनाश माने अशी या पती-पत्नीची नावे सून ते दोघेही मूळचे कोल्हापूरच्या माकडवाला वसाहत, कावळानाका ताराबाई चौकातील रहिवासी आहेत.